
डॉ. वीरेंद्र ताटके- गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
व्ही.जी. सिद्धार्थ यांनी १९९६ मध्ये ‘कॅफे कॉफी डे’ या व्यवसायाची स्थापना केली. कंपनीचे पहिले आउटलेट बेंगळुरू शहरात सुरू झाले आणि काही दिवसांतच देशभरातील अनेक शहरांमध्ये कंपनीची आउटलेट उघडली. ‘कॅफे कॉफी डे’ अर्थात ‘सीसीडी’मुळे भारतात कॉफी पिण्याची संस्कृती वाढली आणि लोकांना एकत्र येण्यासाठी एक चांगली जागा मिळाली, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.