

Cancer treatment cost
sakal
ॲड. सुनील टाकळकर- ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व विमा सल्लागार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या अर्थसंकल्पात कर्करोग रुग्णांना मोलाची भेट दिली आहे. काही वेळा कर्करोगांवरील औषधे आयात करावी लागतात. ही औषधे मुळातच खूप महाग असतात आणि त्यावर कस्टम ड्यूटी (आयातकर) लागू होत असल्याने, आधीच महाग असलेल्या कर्करोग उपचारांचा खर्च लाखो-कोटी रुपयांमध्ये जातो. मात्र, आता कर्करोगाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या १७ महत्त्वाच्या औषधांवर आयातकर माफ करण्यात आलेला आहे; तसेच मधुमेही व्यक्तींकरता लागणाऱ्या अनेक औषधांवर सूट देण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ही सूट औषधांच्या किमती २० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी करेल. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही सूट वरदानासारखी आहे. उदा. विशेषतः केमोथेरपी किंवा विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाच्या औषधांच्या एक डोसची किंमत ५० हजार रुपयांपर्यंत असते, जी आता परवडणारी होईल.