कॅपिटल गेन अकाउंट स्कीममधील व्यापक बदल

कॅपिटल गेन अकाउंट स्कीम 2025 मध्ये सरकारने मोठे डिजिटल आणि प्रक्रिया-संबंधित बदल केले असून करदात्यांसाठी ही योजना अधिक सुलभ व आधुनिक बनली आहे. खासगी बँकांचा समावेश आणि ऑनलाइन खाते बंदीची सुविधा हा करदात्यांसाठी महत्त्वाचा दिलासा आहे.
Overview of the Capital Gain Account Scheme (CGAS)

Overview of the Capital Gain Account Scheme (CGAS)

Sakal

Updated on

डॉ. दिलीप सातभाई (ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट- सीए )

दीर्घकालीन भांडवली लाभ करमुक्त होण्यासाठी गुंतवणूक करण्याकरिता अधिक कालावधी आवश्यक असणाऱ्या करदात्यांच्या सोयीसाठी कॅपिटल गेन अकाउंट स्कीम (सीजीएएस) राबविली जात होती. १९८८ पासून अस्तित्वात असलेल्या या योजनेत शेवटचे बदल २०१२ मध्ये करण्यात आले होते. या योजनेतील ठेवी प्रामुख्याने चेक किंवा डिमांड ड्राफ्टने ठेवल्या जात असत. या ठेवी ठेवण्यासाठी काही विशिष्ट सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि आयडीबीआय बँकेची अधिकृत नियुक्ती करण्यात आली होती. हे ठेव खाते बंद करताना प्राप्तिकर अधिकाऱ्याची सही असलेल्या फॉर्म १५ जीसोबत करदात्याला बँकेत प्रत्यक्ष जावे लागे, त्यासाठी असलेले पासबुक हेच एकमेव वैध खाते स्टेटमेंट मानले जात असे. ही संपूर्ण प्रक्रिया किचकट होती. आता अर्थ मंत्रालयाने १९ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘कॅपिटल गेन अकाउंट (दुसरी सुधारणा) स्कीम, २०२५’ अधिसूचित करून ही योजना अधिक व्यापक, आधुनिक व करदात्यांसाठी अनुकूल बनवली आहे. यातील सुधारणा करदात्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com