
लक्ष्मीकांत श्रोत्री - ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात नेहमी एक गोष्ट कायम असते, ती म्हणजे मला नफा मिळाला नाही तरी चालेल; पण मुद्दल बुडता कामा नये. गुंतवणूक ही केवळ परतावा मिळवण्यासाठीच नसते, तर ती आपली मेहनतीची कमाई सुरक्षित ठेवण्यासाठीदेखील असते. यासाठी निवृत्त व्यक्ती किंवा कमी जोखमीचा मार्ग निवडणारे लोक यांच्यासाठी ‘कॅपिटल प्रोटेक्शन’ अर्थात भांडवल संरक्षण धोरण अत्यंत उपयुक्त ठरते. या धोरणानुसार, आपण मुद्दल सुरक्षित राहील अशा पद्धतीनेही गुंतवणूक करू शकतो.