

CAS and pre-open auctions reshape derivatives trading
Sakal
गौरव बोरा, शेअर बाजार विश्लेषक
भारतीय डेरिव्हेटिव्हज बाजारात सध्या एक महत्त्वाचा विरोधाभास दिसत आहे. एका बाजूला भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने क्लोजिंग ऑक्शन सेशन म्हणजेच ‘सीएएस’ पद्धतीमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर डेरिव्हेटिव्हजच्या सेटलमेंट प्राइस पद्धतीचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सात सप्टेंबर २०२६ पासून प्री-ओपन सेशनमध्ये ‘सीएएस’प्रमाणेच अधिक संरचित कॉल ऑक्शन पद्धतीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे. हा विरोधाभास समजून घेणे प्रत्येक ट्रेडरसाठी महत्त्वाचे आहे.