
सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजदर मंजूर केला आहे. यामुळे ईपीएफओ त्यांच्या सात कोटींहून अधिक खातेधारकांच्या भविष्य निर्वाह निधीवर वार्षिक व्याज जमा करू शकेल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) २८ फेब्रुवारी रोजी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर ८.२५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. हे मागील आर्थिक वर्षात दिलेल्या व्याजदराइतके आहे.