

Cigarette Length Based Price
ESakal
जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर पुढील महिन्यापासून म्हणजेच १ फेब्रुवारी २०२६ पासून तुमची ही सवय तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त महागात पडणार आहे. केंद्र सरकारने तंबाखू उत्पादनांवरील, विशेषतः सिगारेटवरील कर रचनेत एक मोठा आणि महत्त्वाचा बदल केला आहे. आतापर्यंत तुम्ही सिगारेटचा ब्रँड किंवा पॅकेट पाहून किंमत मोजत होता, परंतु आता सिगारेटची 'लांबी' दुकानदाराला तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील हे ठरवेल.