

Airport tariff reforms in India
ESakal
जर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकार विविध विमानतळ शुल्क आणि इतर गुंतागुंतीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. या बदलांचा उद्देश विमानतळ व्यवस्थापन सोपे करणे, कामकाज सुव्यवस्थित करणे आणि प्रवाशांना उत्तम सेवा प्रदान करणे हा आहे. अहवालानुसार, नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने सध्याच्या विमानतळ शुल्क नियमांमध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली आहे.