AI in Finance : गुंतवणुकीसाठी ‘एआय असिस्टंट’

Artificial Intelligence in financial planning : ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर वित्तीय नियोजन, गुंतवणूक, पोर्टफोलिओ रिव्ह्यू, निवृत्ती नियोजन आणि करदायित्व यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये होऊ शकतो. ChatGPT सारखा एआय सहायक, वैयक्तिक सल्लागारासारखा कार्य करू शकतो, पण त्याची मर्यादा ओळखून वापर करावा.
Artificial Intelligence in financial planning

Artificial Intelligence in financial planning

sakal

Updated on

नंदिनी वैद्य‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार

मागील दोन-तीन वर्षांमध्ये जगात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) या शब्दाने खळबळ उडवली आहे. कोणत्याही क्षेत्रात काही काळ गेला, की त्या क्षेत्राची संपूर्णपणे उलथापालथ करणारा एखादा शोध लागतो आणि तो चालू प्रवाहाची दिशा पालटून टाकतो. सध्या अगदी तसेच आयटी क्षेत्राच्या बाबतीत ‘एआय’मुळे घडत आहे.

अमेरिकेतील एक कंपनी ‘ओपन एआय’ यांनी ChatGPT नावाचा एक कृत्रिम सहायक तयार केला, जो ‘गुगल सर्च’च्या फार पुढे जाऊन आपल्याला मदत करू शकतो. हा सहायक मजकूर समजू शकतो, तयार करू शकतो, विचार करू शकतो, लिहू शकतो आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून समस्या सोडविण्यास मदत करू शकतो. ChatGPT आपला प्रश्न वाचतो, अर्थ आणि संदर्भ समजतो, शक्य तितक्या पुढील शब्दांचा अंदाज लावतो आणि सोप्या नैसर्गिक भाषेत प्रतिसाद देतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com