
Discipline, Savings, and Growth: Financial Rules for Chaturmas
आनंद पोफळे
anandpophale@gmail.com
आषाढी एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतच्या चार महिन्यांना चातुर्मास म्हणतात. या चार महिन्यांत भारतभर संत, ज्ञानी व्यक्ती एकांतवासात मनन, चिंतन, वाचन आणि साधना करून अाध्यात्मिक प्रगती करतात. चातुर्मासात भोजनविषयी नियमांचे पालन, दानधर्माचे महत्त्वदेखील सांगितले आहे. याच अनुषंगाने आपली आर्थिक प्रगती करण्यासाठी नेमके कोणते नियम, व्रत, साधना आपण या चातुर्मासात करू शकतो, याचा आढावा घेऊ. चातुर्मासातील उपासना अधिक पुण्य फळ देते, असे म्हणतात, गुंतवणूकदारांनादेखील चातुर्मासातील हे अर्थव्रत फलदायी ठरेल.