
Why Health Insurance is Essential for Families, Professionals, and Seniors
जिगर गडा
आरोग्य विमा ही एक ढाल आहे, असे म्हटले जाते. मात्र, हे केवळ संरक्षण नाही, तर तो एक स्मार्ट आर्थिक निर्णय आहे. जागतिक स्तरावर आर्थिक संकटाच्या प्रमुख कारणांमध्ये वैद्यकीय आणीबाणीचा समावेश होतो. त्यामुळे आरोग्य विमा योजना आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची आहे. ती तुमच्या बचतीचे; तसेच गुंतवणुकीचे रक्षण करते आणि त्याचबरोबर दीर्घकालीन उद्दिष्टांसह तुम्ही वाटचाल करत राहाल, याची खात्रीही देत असते.
अनपेक्षित वैद्यकीय खर्चाच्या आर्थिक ताणापासून ही योजना तुमचे रक्षण करते. गंभीर आजार किंवा अपघातांदरम्यान उत्तम उपचारांसाठी आधार देते, त्याचबरोबर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांही उपलब्ध करुन देते.
आरोग्य विमा योजनेत लवकरात लवकर गुंतवणूक केल्याने कमी प्रीमियम भरावा लागतो आणि करनियोजन करण्यासही मदत होते. यामुळे आरोग्य विमा पॉलिसी केवळ एक सुरक्षितता कवच नव्हे, तर पॉलिसीधारकासाठी एक मालमत्ता बनते.