

Mental Well-being Matters: Overcoming the 'Clouds on the Mind'
sakal
पावसाळी दिवसांत आकाशात मळभ आले, की मनावरही मळभ आल्यासारखे वाटते. विशेष काही मानसिक ताण वा समस्या नसतानाही! कुंद-दमट हवेत, बाहेर पाऊस पडत असताना अंगात आळस भरतो, उगाच उदास वाटते, काही काम करू नयेसे वाटते. कधी कधी वैताग येतो. हे ‘वाटणे’ त्या पावसाळी हवामानापुरते असते.