Premium|CMS Infosystems Business Transformation : UPI वाढले तरी रोकड कायम; सीएमएस इन्फोसिस्टीम्सची एआयकडे मोठी झेप

AI and ATM Technology Growth : यूपीआयचा वाढता वापर असूनही भारतातील रोकड व्यवहार आणि एटीएमची मागणी कायम आहे. या बदलत्या बाजारपेठेत सीएमएस इन्फोसिस्टीम्सने रोकड व्यवस्थापनातून तंत्रज्ञान आणि एआयकडे झेप घेतली आहे.
CMS Infosystems Business Transformation

CMS Infosystems Business Transformation

esakal

Updated on

भूषण ओक - bhushanoke@hotmail.com

भारतात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’ व्यवहारांचा वेग झपाट्याने वाढत असला, तरी रोख व्यवहारांचे महत्त्व अजूनही कमी झालेले नाही. त्यामुळे एटीएम व्यवस्थापन, रोकड वाहतूक आणि त्याला जोडलेल्या तंत्रज्ञानाधारित सेवांची मागणी कायम आहे. या बदलत्या परिसंस्थेचा लाभ घेत सीएमएस इन्फोसिस्टीम्स या कंपनीने पारंपरिक रोकड व्यवस्थापनातून ‘एआय’आधारित तंत्रज्ञान कंपनीकडे यशस्वी वाटचाल केली आहे.

पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी सोपा पर्याय म्हणून ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ अर्थात ‘यूपीआय’ प्रणाली भारतात एप्रिल २०१६ मध्ये सुरू करण्यात आली. नोटाबंदीनंतर तर ‘यूपीआय’चा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. त्यामुळे पुढील काही वर्षांत रोखीचे व्यवहार पूर्णपणे बंद होतील, असा समज निर्माण झाला आहे. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या जवळपास ४१.७ लाख कोटी रुपये चलनात आहेत आणि हा आकडा मागील वर्षापेक्षा १२ टक्क्यांनी जास्त आहे. वाढती अर्थव्यवस्था आणि सुधारणारे जीवनमान लक्षात घेता ही वाढ युक्तिसंगत आहे. भारतात जवळपास पावणेतीन लाख एटीएम असून, त्यातून दरमहा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचे रोकड वितरण होते आणि यातही ४ ते ६ टक्के वाढ दिसून येत आहे. ही वाढ प्रामुख्याने निमशहरी आणि ग्रामीण भागात आहे. त्यामुळे रोख व्यवहार आणि एटीएमची उपयुक्तता किमान पुढील काही वर्षे तरी कमी होण्याची शक्यता दिसत नाही. एटीएम, त्यांची सुरक्षा, नेटवर्क, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि देखभाल या बाबी बँकांच्या मुख्य व्यवसायाचा भाग नसल्या तरी आतापर्यंत त्या स्वतःच सांभाळाव्या लागत होत्या. आता मात्र बँका या सेवा अधिकाधिक कंत्राटी पद्धतीने करून घेण्यावर भर देत आहेत. बँकांना ही सेवा देणारी एक महत्त्वाची कंपनी म्हणजे ‘सीएमएस इन्फोसिस्टीम्स.’

‘सीएमएस इन्फोसिस्टीम्स’ची स्थापना २००८ मध्ये झाली आणि २०२१ मध्ये तिची शेअर बाजारात नोंदणी झाली. ही कंपनी सुरुवातीला बँकांमधून एटीएममध्ये चिलखती वाहनांद्वारे रोकड पोहोचविणारी आणि शाखांदरम्यान रोकडची ने-आण करणारी कंपनी म्हणून उदयास आली. मात्र, आज कंपनीने स्वतःला रोकड व्यवस्थापन (Cash Logistics) आणि आयटी सेवा पुरवणारी तंत्रज्ञानाधारित संस्था म्हणून विकसित केले आहे. ‘एआय’ आणि आयटीकडे झुकणाऱ्या या व्यवसायाचे आता तीन प्रमुख विभाग आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com