शेअर बाजार : कंट्रोल प्रिंट (शुक्रवारचा बंद भाव : रु. ६७३)

कोडिंग-मार्किंग सोल्यूशन्समध्ये आघाडी, दमदार नफावाढ आणि कर्जमुक्त ताळेबंदामुळे कंट्रोल प्रिंटचा शेअर आकर्षक मूल्यांकनात
गुंतवणुकीच्या रडारवर 'कंट्रोल प्रिंट'! कोडिंग-मार्किंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी आकर्षक मूल्यांकनात; कर्जमुक्त ताळेबंदामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष

गुंतवणुकीच्या रडारवर 'कंट्रोल प्रिंट'! कोडिंग-मार्किंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी आकर्षक मूल्यांकनात; कर्जमुक्त ताळेबंदामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष

Sakal

Updated on

भूषण ओक, शेअर बाजार विश्‍लेषक

कंट्रोल प्रिंट लि. ही कोडिंग आणि मार्किंग सोल्यूशन्स क्षेत्रातील एक अग्रगण्य भारतीय कंपनी असून, ती फूड, फार्मा आणि रसायन यांसारख्या उद्योगांसाठी प्रिंटर आणि त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करते. कंपनीची स्थापना १९९१ मध्ये झाली असून, मुंबईत तिचे मुख्यालय आहे. नालगढ, हिमाचल प्रदेश आणि आसाममधील गुवाहाटी येथे तिचे उत्पादन प्रकल्प आहेत. तिचे प्रिंटर औद्योगिक उत्पादनांवर लेबल लावण्यासाठी वापरले जातात. यांच्याद्वारे उत्पादन प्रक्रियेच्या दरम्यान पॅकेजिंग, उत्पादनांच्या पृष्ठभागांवर थेट बॅच क्रमांक, मुदत समाप्तीची तारीख, बारकोड, क्यूआर कोड, लोगो, मार्किंग केले जाते. यात कंटिन्यूअस इंकजेट, थर्मल इंकजेट, हाय-रिझोल्यूशन आणि लेझर मॉडेल्स उपलब्ध आहेत, जे बाटल्या, पुठ्ठ्यांचे खोके, शिपर बॉक्सेस, प्लॅस्टिक्स, धातू, लॅमिनेट्स, केबल्स आणि कापड यांसारख्या विविध औद्योगिक वस्तूंवर मार्किंग करण्यास सक्षम आहेत. या लेबलांमुळे एफएमसीजी, फूड, फार्मा, रसायने आणि पेये यांसारख्या क्षेत्रांमध्ये शोधक्षमता (ट्रेसेबिलिटी), नियमपालन आणि बनावट उत्पादनांच्या प्रतिबंधास मदत होते. कंपनी अचूकता, शोधक्षमता आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करून अनेक नव्या तंत्रज्ञानांचा वापर करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com