
अॅड. विनायक आगाशे - ज्येष्ठ कर सल्लागार
वस्तू आणि सेवाकर अर्थात ‘जीएसटी’अंतर्गत नोंदणी दाखला घेताना दुकानाच्या जागेच्या संदर्भात मालमत्तापत्रक (Property Card), भाडे करार, भाडे पावती, उद्यम आधार आदी विविध कागदपत्रे द्यावी लागतात. या सर्व कागदपत्रांमधील माहिती एकमेकांशी जुळणे म्हणजेच सर्वत्र एकसारखी असणे अत्यावश्यक असते. मात्र, अनेकदा येथेच चूक होते आणि कामात अडथळे येतात. यासाठी पुढील काही बाबी बारकाईने लक्षात घेणे महत्त्वाचे आहे-