

Copper investment strategies
sakal
डॉ. वीरेंद्र ताटके- गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
तुमच्या घरात जुनी तांब्याची भांडी आहेत का? आणि जागेची अडचण होते म्हणून तुम्ही ती मोडीत विकण्याचा विचार करत आहत का? थोडं थांबा. तांब्याची ही भांडी आपल्या कुटुंबाच्या आठवणींचा आणि वारसा आहेतच; शिवाय आर्थिकदृष्ट्याही विचार केला तरी जुनी तांब्याची भांडी मोडीत विकणे शहाणपणाचे ठरणार नाही. तांब्याचे भाव वाढलेले असले तरी ‘स्क्रॅप’ म्हणून विकताना त्याचा खरा भाव मिळत नाही.