

How RBI and the Cooperative Ministry Are Strengthening Urban Co-op Banks
E sakal
Inside Cosmos Cooperative Bank: Vision for India’s Inclusive Financial Future
‘सहकाराविना नाही उद्धार’ असे ब्रीद घेऊन देशात आणि राज्यात सहकाराची चळवळ रुजली. सर्वसामान्यांना सहजपणे आर्थिक मदत देण्यात सहकारी बँकांनी मोलाची कामगिरी केली. बँकिंग गावागावात पोहोचविण्यात सहकारी बँकांचे योगदान मोठे आहे. सहकारी चळवळीने उद्योगक्षेत्रालाही चालना दिली. सहकारी बँकांमध्ये पुण्यातील कॉसमॉस को-ऑप. बँकेचे स्थान महत्त्वाचे आहे. या बहुराज्यीय सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष मिलिंद काळे यांची सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर सुधाकर कुलकर्णी यांनी खास ‘सकाळ मनी’च्या दिवाळी अंकासाठी घेतलेली मुलाखत…
प्रमुख सहकारी बँकांपैकी एक अशा कॉसमॉस को-ऑप बँक या बहुराज्यीय सहकारी बँकेच्या (मल्टी स्टेट) अध्यक्षपदाची धुरा दीर्घकाळ सांभाळणारे व सध्या बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे; तसेच नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज लि. नवी दिल्ली (NAFCUB) या ॲपेक्स संस्थेचे उपाध्यक्षही असणारे मिलिंद काळे यांचा सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव या क्षेत्रात काम करणाऱ्यांना निश्चितच मार्गदर्शक आहे. त्यांच्याशी केलेल्या बातचितीचा सारांश.