Premium|Personal balance sheet for women : ‘बॅलन्सशीट’ समजून घ्या, आर्थिक आरोग्य तपासा; महिलांसाठी वैयक्तिक नेटवर्थ ट्रॅकिंगचा मार्गदर्शक

Women Empowerment Finance : आजच्या बदलत्या आर्थिक जगात महिलांनी कमावती आणि गुंतवणूकदार म्हणून बॅलन्सशीट समजून घेणे आवश्यक आहे; कारण ही केवळ आकड्यांची मांडणी नसून आर्थिक स्वावलंबन आणि आत्मविश्वासाचा स्पष्ट आरसा दर्शवणारी एक प्रभावी गुरुकिल्ली ठरते.
Personal balance sheet for women

Personal balance sheet for women

esakal

Updated on

सारिका चोरडिया - esteemsolutions2003@gmail.com

आजच्या वेगवान आणि बदलत्या आर्थिक जगात महिलांची भूमिका केवळ घरापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्या कमावतात, गुंतवणूक करतात, व्यवसाय सांभाळतात आणि कुटुंबाचे आर्थिक निर्णयही आत्मविश्वासाने घेतात. मात्र, एक मूलभूत प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात अनुत्तरित राहतो... तो म्हणजे आपली खरी आर्थिक स्थिती आपल्याला नेमकी कितपत माहिती आहे?... याचे उत्तर शोधण्यासाठी ‘बॅलन्सशीट’ समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. कारण बॅलन्सशीट ही केवळ आकड्यांची मांडणी नसून, ती आपल्या आर्थिक आयुष्याचा स्पष्ट आरसा आहे.

आपण आपल्या आर्थिक स्थितीचा स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ आढावा घेतो का? अनेक वेळा उत्पन्न चांगले असते; पण कर्जही मोठ्या प्रमाणावर असते. बचत असते; पण ती तरल स्वरूपात नसते. अशा परिस्थितीत आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो. म्हणूनच ‘बॅलन्सशीट’ समजणे म्हणजे आर्थिक आत्मविश्वासाची पहिली पायरी आहे. हा शब्द ऐकला, की अनेकांना तो अवघड वाटतो; पण प्रत्यक्षात ती एका ठराविक दिवशीची आर्थिक स्थिती दर्शवणारी साधी आणि प्रभावी पद्धत आहे. ती आपल्याला सांगते, आपल्याकडे काय आहे? आपण कोणाला काय देणे लागतो? आणि आपल्या हातात किती उरते?

‘बॅलन्सशीट’चे तीन मुख्य घटक

  • मालमत्ता (Assets) ः रोख रक्कम, बँक शिल्लक, गुंतवणूक, घर, सोने, यंत्रसामग्री आदी

  • जबाबदाऱ्या (Liabilities) ः गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड थकबाकी, थकीत खर्च

  • भांडवल/निव्वळ संपत्ती : (Net Worth/Capital) ः मालमत्ता वजा जबाबदाऱ्या

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com