
आपल्या देशात क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, त्याचबरोबर त्याद्वारे खर्च करण्याची रक्कमही वाढत आहे. याचबरोबरीने वेळेत परतफेड न केल्याने थकीत रकमेचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे बँकांनी चिंता व्यक्त केली असून, थकीत कर्जाच्या वसुलीसाठी थकबाकी कमी होण्यासाठी उपाययोजना करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. क्रेडिट कार्डद्वारे होणारा भरमसाट खर्च कमी व्हावा यासाठी क्रेडिट कार्डवरील खर्चाची मर्यादा कमी करण्याचा विचार केला जात आहे.