

Crypto Currency Regulations India
sakal
गेल्या काही वर्षांत ‘डिजिटल मालमत्ता’ किंवा क्रिप्टो करन्सी हा विषय जागतिक पातळीवर गाजला आहे. भारतातही यातील गुंतवणुकीचे आकर्षण वाढत असताना, त्यातील अनिश्चिततेमुळे अनेक सुज्ञ गुंतवणूकदार संभ्रमात होते. मात्र, केंद्र सरकारने आता या क्षेत्राला कायद्याच्या चौकटीत आणण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलले आहे. ‘फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट’कडे (FIU-IND) आतापर्यंत ४९ क्रिप्टो बाजार मंचांनी (Exchanges) अधिकृत नोंदणी केली आहे. या बदलांचा सर्वसामान्य गुंतवणूकदारांवर होणारा परिणाम आणि खबरदारी काय घ्यावी, याविषयी थोडक्यात माहिती.