
विशाखा बाग
gauribag7@gmail.com
‘क्रिप्टो द डिस्रप्टर, द राइज ऑफ मनी फ्रॉम बार्टर टू बिटकॉइन’ या नव्या पुस्तकात लेखक मुकेश जिंदाल यांनी ‘क्रिप्टो’विश्वाची सफर घडवली आहे. जागतिक स्तरावर आणि भारतात कोणकोणत्या क्रिप्टो करन्सी आहेत, कोणत्या क्रिप्टो करन्सी चांगल्या प्रकारे नफा मिळवून देतात, क्रिप्टो करन्सीमध्ये होत असलेले बदल, या प्रणालीमध्ये हॅकर्सनी घातलेला धुमाकूळ, यामध्ये कशी फसवणूक होते, हे सर्व काही लेखकाने सांगितलेले आहे. ही क्रिप्टो करन्सी कोणाच्याही नियंत्रण वा नियमनाखाली येत नसल्याने फसवणुकीचे अनेक प्रकार सुरू झालेले आहेत. लेखकाने यातील सर्व धोक्यांची जाणीवसुद्धा करून दिलेली आहे.