

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका!
esakal
New Delhi : अनेक कारणांमुळे आधीच अडचणींचा समाना करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी एक फटका बसला आहे. देशात महागाईचा भडका उडाला असून, वाढलेल्या महागाईचा सर्वाधिक चटका देशातील ग्रामीण भागाला सहन करावा लागत असल्याचे ताज्या आकडेवारीवरून दिसते आहे. दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या ग्रामीण जनतेचे वाढलेल्या महागाईमुळे कंबरडे मोडल्याचे चित्र आहे.