

A Nagpur consumer commission ruling highlights that OTP-authorised transactions do not automatically end a bank’s responsibility in cyber fraud cases.
Sakal
ॲड. रोहित एरंडे, कायद्याचे जाणकार
सध्या डिजिटल बँकिंगच्या वाढत्या वापराबरोबर सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्येही खूप वाढ झाली आहे. एखाद्या ग्राहकाने ‘ओटीपी’ वापरून एखाद्या व्यवहारास मान्यता दिली असेल, तरी बँकेची जबाबदारी पूर्णपणे संपते का? असा महत्त्वाचा प्रश्न नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर नुकताच आला. या प्रकरणातून सर्वांनी काय काळजी घेणे गरजेचे आहे, ते स्पष्ट होते.