

Cybercrime
E sakal
शिरीष देशपांडे
deshpande.06@gmail.com
विज्ञानातील वेगवेगळे शोध, तंत्रज्ञानाचा वापर आणि आर्थिक व्यवहारातील डिजिटल सुविधा यांनी प्रत्येक क्षेत्रात सहजता आणि गतिमानता आणली आहे. डिजिटल बँकिंग आणि इंटरनेट आधारित तंत्रज्ञान यांमुळे आपल्या कार्यपद्धतीत खूपच सोपेपणा आला आहे. कोरोनाच्या महासाथीच्या आधी तो तेवढा उपलब्ध नव्हता.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) या संस्थेमुळे रोखीचे व्यवहार अतिशय सुलभ झाले. वस्तू ऑनलाइन खरेदी करण्याचे प्रमाण वाढले. समाजमाध्यमांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला.
त्याचवेळी संगणक, इंटरनेट नेटवर्क आणि नेटवर्कची साधने वापरून आर्थिक लुबाडणूक करणे म्हणजे सायबर गुन्हेगारीही वाढली. याद्वारे कोणत्याही व्यक्तीचा पैसा अवैधरित्या हस्तगत केला जाऊ लागला.
सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. सायबर गुन्हेगार नवनव्या कल्पना लढवून, तुमच्या अज्ञानाच्या फायदा घेऊन, तुमची माहिती घेऊन, तुम्हाला घाबरवून लुबाडणूक करत आहेत.