Premium|DA VS HRA : महागाई भत्ता आणि घरभाडे यात फरक काय?

DA calculation: अनेकांना महागाई आणि घरभाडे भत्ता यातील फरक माहीत नसतो. तो माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या विषयाबद्दल अधिक माहिती देणारा 'सकाळ मनी'चा हा लेख जरूर वाचा.
What is the difference between Dearness Allowance and HRA
What is the difference between Dearness Allowance and HRAE sakal
Updated on

ॲड. प्रतिभा देवी, ज्येष्ठ कर सल्लागार

pratibhasdevi@gmail.com

नोकरदारवर्गाला वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी पगारात महागाई भत्ता दिला जातो. महागाईवाढीमुळे कर्मचाऱ्यांची क्रयशक्ति कमी होऊ नये आणि त्यांनी काम चांगले करावे या हेतूने महागाई भत्ता दिला जातो. काळानुरुप घरभाडे, प्रवास भत्ता असे प्रकार वाढले. अनेकांना महागाई आणि घरभाडे भत्ता यातील फरक माहीत नसतो. त्याबाबत सविस्तर माहिती देण्याचा हा प्रयत्न...

आपल्या देशात महागाई भत्ता (डीए-डिअरनेस अलाउन्स) देण्याची सुरुवात १९३७ मध्ये झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी महागाई वाढल्यामुळे कर्मचारी आणि कामगारांना महागाई भत्ता देण्यास सुरवात झाली, नंतर १९५०-६०च्या दशकात यात सुधारणा होऊन वेगवेगळ्या वेतन आयोगानुसार भत्ता वाढविण्यात आला. इतर भत्त्यांप्रमाणे ‘डीए’ ही निश्चित रक्कम नाही. परंतु, राहणीमानाचा खर्च, चलनवाढीचा दर आणि ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) यांसारख्या आर्थिक घटकांवर आधारित त्यात चढ-उतार होतात. सरकारी कर्मचाऱ्यांना; तसेच काही खासगी कंपन्यादेखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘डीए’ देतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com