

Digital Banking
Sakal
Digital Banking Rules : डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं (RBI) जुलैमध्ये जारी केलेल्या मसुद्यावर उद्योगांकडून आलेल्या सूचना आणि अभिप्राय अभ्यासल्यानंतर ही अंतिम मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नव्या नियमांमुळे बँकांची मंजुरी प्रक्रिया अधिक कडक होईल, ग्राहकांचे संरक्षण वाढेल आणि तक्रार निवारण अधिक मजबूत होईल.