

A Golden Chain Around the Neck — But It’s Digital!
Sakal
- डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
सोन्यातील गुंतवणुकीने गेल्या वर्षभरात इतका जबरदस्त परतावा दिला आहे, की सोन्यातील गुंतवणूक प्रत्येक गुंतवणूकदाराच्या गळ्यातील ताईत झाली आहे. अर्थात, प्रत्यक्ष सोने खरेदी करण्यापेक्षा गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये डिजिटल गुंतवणूक करणे अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सोपे आहे, हे अनेक गुंतवणूकदारांना आता स्वानुभवाने पटलेले आहे. त्यातही अशा गोल्ड फंडांमध्ये एकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा ‘एसआयपी’ पद्धतीने केली, तर गुंतवणुकीत नियमितता राखण्याबरोबरच सोन्याच्या भावातील चढ-उतारांचा फायदादेखील करून घेता येतो, हेसुद्धा गुंतवणूकदारांच्या लक्षात येऊ लागले आहे.