

Digital Life Certificate Safety Tips and Assistance
Sakal
हेमंत काळकर ( निवृत्त बँक अधिकारी )
निवृत्तिवेतनधारकांसाठी सरकारने ऑनलाइन आधार निगडित बायोमेट्रिक डिजिटल ‘जीवन प्रमाणपत्र’ सुविधा उपलब्ध केली आहे.
कालमर्यादा
८० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या निवृत्तिवेतनधारकांना ३० नोव्हेंबरपर्यंत व ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना एक महिना आधी म्हणजे ३१ ऑक्टोबरपर्यंत हयातीचा दाखला देता येतो. संरक्षण दलातून २०२३ नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर १२ महिने संपले, की हा दाखला द्यावा लागतो. काही संस्था ३१ डिसेंबरपर्यंतदेखील ही मुदत देतात.