Premium|Digital Lean : डिजिटल कर्जसुविधा उत्तम सोय, आव्हाने अनेक!

RBI digital loan guidelines : झटपट कर्ज देणाऱ्या ॲपची संख्या बेसुमार वाढली आणि त्याचबरोबर फसवणुकीचे प्रकारदेखील. सुरुवातीला चांगली सोय वाटणाऱ्या या सुविधेने अनेक आव्हाने उभी केली आहेत.
Fast Loans, Bigger Risks? Understand India’s Digital Lending Landscape Today
Fast Loans, Bigger Risks? Understand India’s Digital Lending Landscape Todayई सकाळ
Updated on

RBI's Crackdown on Fake Loan Apps: Safer Digital Lending Starts July 2025

अशोक जोशी

ashokjoshi९@yahoo.com

डिजिटल कर्ज ही संकल्पना आपल्याकडे या दशकातीलच मात्र, तिने खरी उचल घेतली ती कोविड-१९ महासाथीच्या काळात. त्या वेळी बँकांना व कर्जदारांना डिजिटल पद्धतीने कर्जव्यवहार करणे सोयीचे आणि व्यवसायवाढीसाठी गरजेचे असल्याने अशा व्यवहारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्याचबरोबर अशा प्रकारे अगदी काही मिनिटांत कर्ज देणाऱ्या ॲपची संख्यादेखील बेसुमार वाढली आणि त्याचबरोबर फसवणुकीचे प्रकारदेखील वाढले. त्यामुळे सुरुवातीला चांगली सोय वाटणाऱ्या या सुविधेने ग्राहकांबरोबर बँका, सरकार यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी केली आहेत.

डिजिटल कर्ज पद्धतीने कर्ज अगदी झटपट मिळत असल्याने ग्राहकांना त्याचे आकर्षण वाटू लागल्याने बँकादेखील ‘दहा मिनिटांत कर्जाचे पैसे तुमच्या खात्यात’ असा प्रचार करू लागल्या. त्याचबरोबर ‘आता खरेदी करा व नंतर पैसे द्या’ अशा योजनांची खैरात होऊ लागली. खोट्या ॲपच्या सुळसुळाटामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढू लागले. याबाबत सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये १००पेक्षा अधिक ॲपवर बंदी आणली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com