
Gold and silver jewellery shops glittering with festive buyers this Diwali.
Sakal
अमित मोडक, अनुभवी कमोडिटीतज्ज्ञ पीएनजी अँड सन्सचे संचालक-सीईओ
दिवाळी आणि मागोमाग येणारी लग्नसराई यासाठी दागदागिने खरेदी करण्याची इच्छा असलेल्या लोकांना सोने-चांदीच्या गगनाला भिडणाऱ्या भावामुळे थोडा आखडता हात घ्यायला लावला आहे, तरीही दसऱ्याला झालेली सोनेखरेदी पाहता, भारतीयांचे जगप्रसिद्ध सोनेप्रेम स्पष्ट होते. सोने-चांदीचे भाव नेमके एवढे कशामुळे वाढत आहेत, असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. याचे उत्तर आहे आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये. ते कसे हे जाणून घेऊ या.