
गुंतवणुकीची पुढील दिशा काय असेल?
ई सकाळ
Boom or Bust? India’s Stock Market Faces Tariff Shock, Global Uncertainty, and Festive Hopes
भूषण महाजन
kreatwealth@gmail.com
आपल्या देशासमोर आव्हाने भरपूर आहेत. कोकणातील एका म्हणीप्रमाणे, आधी दसऱ्यातून जगू आणि मग दिवाळीचा दिवा बघू. आपल्या नेतृत्वाने व उद्योग-व्यापार जगताने जर हे आव्हान पेलले तर दिवाळी जोरात जाणार, किमान शिमगा करायची वेळ येणार नाही. ‘जीएसटी बचत उत्सव’ व त्यातून निर्माण झालेली वाढीव मागणी यामुळे तिसरी तिमाही चांगली जाईल, पुढे मात्र कंपन्यांना स्वतःच्या बळावर मार्ग काढत विक्री व नफा वाढवावा लागेल. हाच उत्साह पुढे टिकून राहिला तर वर्ष सरासरीइतके चांगले जाईल.
गेल्या वर्षी ३० सप्टेंबर २०२४ रोजी ‘निफ्टी’ निर्देशांक २५,८१० अंशांवर होता. त्या दिवशी शेअर बाजाराने प्रथम निराशा दर्शवत मंदीची पहिली चाहूल दिली. त्याच्या आदल्याच दिवशी तेजीचा उच्चांक (‘निफ्टी’ २६,२७७ व ‘सेन्सेक्स’ ८५,५७० अंश) नोंदविल्यावर निर्देशांकांची गाडी घसरणीला लागली.
या वर्षी ३० सप्टेंबर २०२५ रोजी ‘निफ्टी’ निर्देशांक २४,६११ अंशांवर होता. (म्हणजे जवळपास पावणेपाच टक्के खाली). इतर निर्देशांकही असेच खाली आले.