
Diwali Deals or Digital Deceit? Don't Fall for Online Scams.
Sakal
शिरीष देशपांडे - सीए व सायबर गुन्हेविषयक अभ्यासक
सध्या दिवाळीमुळे सर्वांची जोरदार खरेदी सुरू आहे. अलीकडच्या काळात ऑनलाइन खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी विशेष सवलत योजनांचा मारा केला आहे. भरघोस सूट, एकावर एक मोफत, अशा भुरळ पाडणाऱ्या ऑनलाइन शॉपिंगच्या जाहिराती ग्राहकांना आकर्षित करत असतात. याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी दबा धरून बसलेले आहेत. आपली फसवणूक आपणच थांबवू शकतो. त्यासाठी रिझर्व्ह बँकेचा सजग व्हा, जाणकार बना! हा मंत्र लक्षात ठेवणे आवश्यक आहे.