

US India Trade War 2026
esakal
नीलेश साठे - nbsathe@gmail.com
सध्या सर्व जगाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या लहरी निर्णयांनी हादरवून टाकले आहे. त्यांच्या आयातशुल्काच्या अस्त्राने अनेक देशांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. भारतासह अनेक देशांवर त्यांनी जबरदस्त आयातशुल्क लादले आहे. त्यांच्या या निर्णयाचा निर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. भारत देशांतर्गत मागणी आणि इतर देशांशी व्यापार वाढवून या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडेच ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५०० टक्क्यांपर्यंत शुल्क लादले जाऊ शकते, असे जाहीर केले. अशा परिस्थितीत भारताने काय करणे अपेक्षित आहे, याचा वेध...