Premium|Trump tariff : भारत-अमेरिका व्यापारयुद्धात कोण जिंकणार कोण हरणार?

US India trade war : भारत आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफ युद्ध म्हणजे एक ओढाओढीचा सामना झाला आहे. कधी इकडचं पारडं जड तर कधी तिकडचं.
US India trade war 2025

US India trade war 2025

E sakal

Updated on

भूषण महाजन, kreatwealth@gmail.com

(अर्थबोध शेअर्स अँड इन्व्हेस्टमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक; तसेच आर्थिक घडोमोडी व भांडवली बाजाराचे अनुभवी विश्लेषक)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ‘टेरिफ’ लावण्याची हौस जुनीच आहे. प्रथम अध्यक्ष झाल्यावर त्यांनी असाच ‘टेरिफ बॉम्ब’ भारतावर टाकला होता. आपल्याही देशाने जशास तसे वागत अमेरिकी मालावर आयात शुल्क लादले होते. त्यावेळी हे प्रकरण फारसे चिघळले नाही. आपली अमेरिकेबरोबरची निर्यातही त्यावेळी कमी होती. आता तसे नाही. दोन्ही देशांनी ‘तुझे माझे जमेना’ अशी भूमिका घेतलेली आहे, हे खरे!

डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेने लादलेल्या टेरिफबद्दल आतापर्यंत बरेच लिहिले-ऐकले गेले आहे. त्याची आणखी चिवडाचिवड न करता आता पुढे काय याचा विचार करणे संयुक्तिक ठरेल. जॉर्ज बर्नाड शॉ एकदा बोलून गेले आहेत, की ‘Never wrestle with a pig. You both get dirty, and the pig likes it.’

तुम्ही जिंकला किंवा हरला काही फरक पडत नाही, दोघेही चिखलाने माखाल, तुम्हाला ते कदाचित आवडणार नाही; पण डुकराला ते आवडते. याच म्हणीवर विश्वास ठेवून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचे किमान चार फोन उचलले नाहीत, असे एक जर्मन पत्रकार म्हणतो. खरे-खोटे देव जाणे.

दुसऱ्या एका पत्रकाराचे म्हणणे आहे, की आपले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी द्विपक्षीय चर्चेत न झुकता; थंडपणे राष्ट्रनिष्ठ भूमिका घेतली, हे ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांना आवडले नाही. काही असो, दोन्ही देशांनी ‘तुझे माझे जमेना’ अशी भूमिका घेतलेली आहे, हे खरे!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com