

US Economic Nationalism Challenges
esakal
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’च्या घोषणेने जनतेच्या भावनांना हात घातला, मात्र आता या घोषणांच्या मागे लपलेल्या आर्थिक राष्ट्रवादाचे चटके अमेरिकी जनतेलाच बसू लागले आहेत. ट्रम्प यांच्या लहरी घोषणांचा फटका अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. जग अमेरिकेकडून इतर पर्यायांकडे वळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, अमेरिकेची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे, याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न...
ल्या शतकभरात जगाच्या राजकारणात आणि अर्थकारणात अमेरिकेने असे एक साम्राज्य उभे केले, ज्याची ताकद फक्त लष्करी सामर्थ्यात नव्हती, तर विज्ञान, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि मुक्त विचारांमध्ये होती. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने निर्माण केलेला विश्वास इतका ठाम होता, की तिच्या नेतृत्वाशिवाय जगाचा आर्थिक श्वासही घ्यायचा नाही, अशी धारणा तयार झाली होती. ‘अमेरिकन ड्रीम’ ही संकल्पना
प्रत्येक तरुणाच्या मनात आशेचा किरण बनून झळकायची. आज तीच अमेरिका एका अशा वळणावर उभी आहे, जिथे तिच्या पायाखालची माती सैल होत चालली आहे. आर्थिक अस्थैर्य, राजकीय ध्रुवीकरण आणि जागतिक अविश्वास या तिन्ही घटकांनी मिळून अमेरिकेच्या भवितव्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.