

Personal Finance: Dr. Virendra Tatke Emphasizes Thrift as a Sustainable Lifestyle
Sakal
डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी अलीकडेच देशवासीयांना काही गोष्टींवरील खर्च कमी करण्याचे आवाहन केले आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती, वाढती महागाई, इंधनाचे दर, युद्धजन्य परिस्थिती आणि बदलणारे आर्थिक समीकरण यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण येऊ शकतो. अशा वेळी देशातील प्रत्येकाने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे आणि शक्य त्या ठिकाणी काटकसर करायला हवी. अर्थात, काटकसर ही केवळ एखाद्या संकटाच्या काळापुरती मर्यादित गोष्ट नसून, ती एक जीवनशैली असली पाहिजे. कारण ज्यांच्या जीवनात काटकसर असते, त्या व्यक्ती आणि कुटुंब आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्थिर राहतात.