

Analysts believe the stock could benefit from strong momentum, supported by positive chart patterns and rising trading volumes.
Sakal
मकरंद विपट, ‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट INH000020402
एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस लि. ही गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेली १०० टक्के भारतीय मालकीची सर्वांत मोठी औद्योगिक वायू उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी ऑक्सिजन, नायट्रोजन, आर्गोन, हेलियम, हायड्रोजन, ॲसिटिलीन, नायट्रस ऑक्साइड आणि विशेष वायूंसह विविध औद्योगिक वायूंचे उत्पादन आणि पुरवठा करते. वैद्यकीय वायू, ड्राय आईस, एलपीजी, वेल्डिंग मिश्रणे आणि सिंथेटिक एअर यांचाही ती पुरवठा करते. कंपनी पूर्व आणि दक्षिण भारतात औद्योगिक वायूंचे मोठ्या प्रमाणात; तसेच पॅकेज्ड स्वरूपात उत्पादन आणि पुरवठा करते. कंपनी वैद्यकीय, रासायनिक, बांधकाम, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमधील व्यवसायांमध्येही कार्यरत आहे.