

Elon Musk Trillionaire
Sakal
Elon Musk Salary : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा नवीन विक्रम केला आहे. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांना कंपनीने इतिहासातील सर्वात मोठे कॉर्पोरेट वेतन पॅकेज मंजूर केले आहे. टेक्सास येथे झालेल्या टेस्लाच्या वार्षिक बैठकीत 75 टक्क्यांहून अधिक भागधारकांनी या पॅकेजच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.