माझे पैसे; माझी जबाबदारी!

संस्थेने अलीकडेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दावा न केलेले तब्बल एक लाख कोटी रुपयांचे मूल्य असलेले शेअर आणि सहा हजार कोटी रुपयांएवढी लाभांशाची रक्कम पडून आहे. एवढी मोठी रक्कम योग्य व्यक्तीच्या हाती पडावी म्हणून ‘सेबी’सारख्या संस्था सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी गुंतवणूकदार मेळाव्यासारखे उपक्रम राबवून ‘सेबी’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे.
Citizens joining hands for financial awareness under the slogan — “My Money, My Responsibility!”

Citizens joining hands for financial awareness under the slogan — “My Money, My Responsibility!”

Sakal

Updated on

डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक

पैसे कमावण्याइतकंच, किंबहुना थोडं अधिक महत्त्व कमावलेल्या पैशांचा हिशेब ठेवण्याला आहे, अशा अर्थाचे एक इंग्रजी वाक्य प्रसिद्ध आहे. दुर्दैवानं पैसे मिळवण्याला जितकं महत्त्व दिलं जातं, तेवढं महत्त्व त्या पैशांतून केलेल्या गुंतवणुकीचा हिशेब ठेवण्याला दिलं जात नाही. यामुळे अनेकदा वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांत गुंतवलेली रक्कम वर्षानुवर्षे पडून राहण्याची शक्यता निर्माण होते. विविध संस्था यासंदर्भातील माहिती वेळोवेळी प्रसारित करत असतात, जेणेकरून लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचेल आणि जनजागृती होईल. उदा. गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण या संस्थेतर्फे एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे, ज्यावरून दावा न केलेली शेअरमधील गुंतवणूक; तसेच लाभांशाची रक्कम यांची माहिती दिली जाते आणि योग्य पुरावा सादर करून अशा गुंतवणुकीवर संबंधित व्यक्ती हक्क सांगू शकते. संस्थेने अलीकडेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दावा न केलेले तब्बल एक लाख कोटी रुपयांचे मूल्य असलेले शेअर आणि सहा हजार कोटी रुपयांएवढी लाभांशाची रक्कम पडून आहे. एवढी मोठी रक्कम योग्य व्यक्तीच्या हाती पडावी म्हणून ‘सेबी’सारख्या संस्था सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी गुंतवणूकदार मेळाव्यासारखे उपक्रम राबवून ‘सेबी’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com