

EPACK Prefab Technologies Shares at Rs 233 Explore Stock Performance Growth Opportunities and Business Outlook
sakal
प्रीफॅब्रिकेटेड इमारती बनवणे हा मुख्य व्यवसाय असलेली इपॅक प्रीफॅब टेक्नॉलॉजीज ही कंपनी सध्या वेगाने विस्तार करत आहे. तिच्या उत्पन्नाचा ८६ टक्के वाटा प्रीफॅब्रिकेटेड इमारतींच्या उत्पादनातून, तर बाकी वाटा सँडविच पॅनेल, धातूची दारे-खिडक्या आणि ईपीएस पॅकेजिंगच्या उत्पादनातून येतो. कंपनीचे मुख्यालय ग्रेटर नोएडा येथे असून, तिचे मुख्य उत्पादन प्रकल्प नोएडा, घिलोठ आणि मामबट्टू येथे आहेत. कंपनी ऑक्टोबर २०२५ मध्ये बाजारात नोंदणीकृत झाली असून, सिंघानिया आणि बोथरा कुटुंबे प्रवर्तक आहेत.