
Union Minister Mansukh Mandaviya announces EPFO’s new facility allowing members to transfer their PF balance directly to their pension account, ensuring better retirement security.
esakal
EPFO introduces new option for members to transfer PF funds to pension accounts: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सदस्यांसाठी एक महत्त्वाची आणि सुविधेची बातमी आहे. कारण, कामगार आणि रोजगार केंद्रीयमंत्री मनसुख मांडविया यांनी सागितलं आहे की, ईपीएफओ सदस्यांना हवे असल्यास त्यांचा पीएफ निधी ते त्यांच्या पेन्शन खात्यातही हस्तांतरित करू शकतात.
कामगार मंत्रालयाचा असा विश्वास आहे की, या बदलामुळे सुमारे ३०० दशलक्ष ईपीएफओ सदस्यांना फायदा होईल. ईपीएफओच्या ८.२५ टक्के वार्षिक व्याजदर आणि चक्रवाढीच्या फायद्यामुळे त्यांना एक चांगला रिटायरमेंट फंड तयार करण्यास मदत होईल. तसेच सरकारचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे सदस्यांना निधी सहज उपलब्ध होईल आणि निवृत्तीसाठी पुरेशी बचत देखील सुनिश्चित होईल.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO)अंशतः पैसे काढण्याचे नियम पूर्णपणे बदलले आहेत. नव्या पद्धतीप्रमाणे आधी अस्तित्वात असलेले १३ वेगवेगळे आणि गुंतागुंतीचे नियम एकत्र केलेत. आता फक्त तीन प्रमुख गटांमध्ये या नियमांची विभागणी केली आहे. यामध्ये मूलभूत गरजा,घराशी संबंधित गरजा आणि विशेष परिस्थिती यांचा समावेश आहे. या नव्या सुधारणेमुळे सुमारे ३० कोटी पीएफ धारकांसाठी पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि सोपी होईल, असा दावा करण्यात आलाय.
याव्यतिरिक्त आता केंद्र सरकारने जनरल प्रॉव्हिडंट फंड आणि इतर संबंधित फंड्सवरील व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी जीपीएफवरील व्याजदर ७.१टक्के राहील.