
डॉ. वीरेंद्र ताटके - गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
मंत लोकांना कसली आलीय आर्थिक समस्या! त्यातही अतिउच्च उत्पन्न गटातील व्यक्तींकडे (हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल) पैशांची मुबलकता एवढी असते, की त्यांना आयुष्यात कोणत्याही आर्थिक समस्येचा मुकाबला करावाच लागत नसणार,’ असा विचार बहुतेकांच्या डोक्यात असतो. परंतु, हा समज खोटा ठरवणारे एक सर्वेक्षण पुढे आले आहे.
मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स आणि डन अँड ब्रॅंडस्ट्रीट या संस्थांनी केलेल्या या सर्वेक्षणात भारतातील २८ शहरांमधील उच्च संपत्ती असलेल्या ४६५पेक्षा अधिक कुटुंबांचा समावेश होता. सर्वेक्षणात समावेश झालेल्या व्यक्तींचे वय तीस वर्षांपेक्षा अधिक होते आणि प्रत्येक कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न २० लाख रुपयांपेक्षा अधिक होते. काही कुटुंबांचे उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा अधिक होते. या सर्वेक्षणात पुढे आलेले काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत.