
डॉ. वीरेंद्र ताटके - गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
माझे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिचित लोक माझ्यापेक्षा अधिक श्रीमंत आहेत असा ठाम (गैर)समज अनेकांच्या डोक्यात पक्का झालेला असतो. मजेची गोष्ट म्हणजे या गैरसमजुतीने फक्त गरिबांना पछाडलेले असते असे नव्हे, तर अनेक श्रीमंतदेखील या विचाराने पछाडलेले असतात. शिवाय हा गैरसमज फक्त आपल्या देशातील लोकांमध्ये आढळतो असे नव्हे, तर इतर देशातील लोकदेखील या विचाराने पछाडलेले दिसतात. यातील तथ्य शोधण्यासाठी विविध प्रकारचे अभ्यास करण्यात आले आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या हम्फ्रे यांग या तरुणाने यामागील सत्य शोधून काढण्याच्या प्रयत्न केला. त्याच्या मते या गैरसमजुतीमागे पुढील सात कारणे आहेत. त्यातील सत्यता कळल्यानंतर कदाचित आपले मत बदलू शकते.