

Alcohol and health insurance premium
esakal
कोणताही सण साजरा करणे हा सर्वांनी एकत्र येऊन आनंद लुटण्याचे निमित्त असते, परंपरेचा उत्सव असतो; पण आधुनिक काळात सण म्हणजे खरेदी, पार्ट्या आणि खर्च अशी मानसिकता झालेली दिसत आहे. त्यामुळे अलीकडे सण साजरे करताना मद्य, सिगारेट, खाद्यपदार्थ आणि मनोरंजनावर वारेमाप खर्च केला जात असल्याचे दिसते. नववर्षाचे स्वागत करताना, पार्टीमध्ये मद्यपान करणे, धूम्रपान करणे याचे प्रमाण वाढत असून, अति मद्यपान व धूम्रपानाचे आरोग्यावर आणि आरोग्य विम्यावर होणारे परिणाम गंभीर आहेत. त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
ज बहुतेक लोकांकडे आरोग्य विमा आहे. परंतु, फार कमी जणांना माहिती आहे, की आपल्या जीवनशैलीतील सवयी विशेषतः मद्यपान, धूम्रपान, व्यायामाचा अभाव या गोष्टी विमा कंपन्यांच्या नजरेत ‘जोखीम घटक’ म्हणून पाहिल्या जातात. त्याचा परिणाम प्रीमियमवर आणि दावा मंजूर होण्यावरही होऊ शकतो.