

Futures and Options Trading Risks Explained Know the F and O Maze and Important Things Every Trader Should Know
sakal
गौरव बोरा, शेअर बाजार विश्लेषक
भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने आर्थिक वर्ष २०२६ मधील फ्युचर्स अँड ऑप्शन्स व्यवहारांच्या (एफ अँड ओ) आकडेवारीचा एक अभ्यास अहवाल नुकताच जाहीर केला आहे. यातील आकडेवारीवरून ‘एफ अँड ओ’ बाजारातील नफ्या-तोट्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. वर्ष २०२६ मध्ये सुमारे ८७.७ टक्के वैयक्तिक गुंतवणूकदारांनी तोटा सहन केला. त्यांचा एकत्रित निव्वळ तोटा ९१,६८५ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये हा तोटा सुमारे १.१२ लाख कोटी रुपये होता. मात्र, सरासरी तोटा करणाऱ्या गुंतवणूकदारांचा तोटा सुमारे १.१७ लाख रुपये होता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे व्यवहार करणारे सर्वाधिक गुंतवणूकदार ३० वर्षांखालील तरुण असून, त्यापैकी ८९ टक्के जणांनी तोटा सहन केला आहे. दरवर्षी या बाजारात येणाऱ्या तरुणांची संख्याही वाढत आहे.