"Check whether a fake loan has been taken using your PAN card in just minutes through secure online verification."
ESakal
How to Check if Someone Took a Loan Using Your PAN Card : तुमचे पॅन कार्ड सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य देखील असू शकते. अशावेळी आपल्या माघारीच कोणी आपल्याच नावावर कर्ज घेतय का? हे तुम्ही अवघ्या काही मिनिटांतच पडताळून पाहू शकता. आजच्या डिजिटल युगात, ऑनलाइन फसवणूक इतक्या वेगाने वाढली आहे की तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर कोण करेन हे सांगणे कठीण आहे.
पॅनकार्ड हे केवळ आयकर भरण्याचे साधन नाही, तर ते तुमची संपूर्ण आर्थिक ओळख आहे. बँक खाते उघडणे, कर्ज घेणे, मोठे व्यवहार करणे आणि केवायसी अपडेट करणे यापासून ते सर्वच महत्त्वपूर्ण कामांसाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. अशावेळी तुमच्याच पॅनकार्डचा वापर करून कुणीतरी आर्थिक घोटाळा करून तुम्हाला अडचणीत आणू शकतो.
आपल्या पॅनचा वापर करून कुणीतरी कर्ज मिळवण्यासाठी फसवेगिरी करत आहे का? हे जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर तपासणे. यासाठी तुम्ही फक्त कोणत्याही क्रेडिट ब्युरो वेबसाइटला भेट द्या जसे की CIBIL, Experian, CRIF High Mark किंवा Equifax आणि तुमचा पॅन नंबर टाकून क्रेडिट रिपोर्ट डाउनलोड करा.
रिपोर्ट काळजीपूर्वक वाचा आणि हे तपासा की तुम्हाला असे कोणतेही कर्ज दिसते का जे तुम्ही घेतलेले नाही? तुम्हाला नवीन बँक किंवा NBFC कडून काही चौकशी आठवते का? तुम्हाला EMI डिफॉल्ट किंवा थकबाकी दिसते का? जर यापैकी काही संशयास्पद वाटत असेल, तर समजून घ्या की कोणीतरी तुमच्या पॅनचा गैरवापर केला आहे.
ज्या बँकेकडून फसवे कर्ज जारी केले जात आहे त्या बँकेशी संपर्क साधा. जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल करा; पुढील कायदेशीर कारवाईसाठी हे आवश्यक आहे. तसेच आयकर विभाग आणि क्रेडिट ब्युरोकडे तुमची तक्रार अपडेट करा. तुमच्या क्रेडिट रिपोर्टमधून चुकीच्या नोंदी काढून टाकण्यासाठी डिस्प्यूट फॉर्म भरा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.