

Federal Reserve Rate Hike Explained How Higher US Interest Rates May Affect Indian Inflation Rupee Value and Household Budgets
sakal
दीपाली किणीकर, चार्टर्ड अकाउंटंट-सीए
अमेरिकेच्या फेडरल बँकेने गेल्या १६ सप्टेंबर २०२६ रोजी व्याजदर पाव टक्क्याने वाढवून ३.७५ ते ४ टक्के केले. २०२३ नंतरची ही पहिलीच दरवाढ आहे. याआधी डिसेंबर २०२५ मध्ये ‘फेड’ने दर कमी करून ३.५० ते ३.७५ टक्क्यांवर आणले होते. ही दरवाढ अचानक झाली नाही. जुलैच्या बैठकीत दर स्थिर ठेवण्याच्या बाजूने नऊ सदस्यांनी मत दिले, तर तीन सदस्यांनी त्याच वेळी पाव टक्का दरवाढीची मागणी केली होती. त्यामुळे बाजाराला या निर्णयाची आधीच कल्पना होती. आता रिझर्व्ह बँकेनेही पाव टक्क्याने व्याजदर वाढविला आहे.