Festival Economy भारतीय अर्थव्यवस्थेतील सणांचा जादुई प्रभाव
ई सकाळ
Premium|festival economy: सणासुदीचा अर्थव्यवस्थेला बूस्टर
डॉ. अनिल धनेश्वर
anil.dhaneshwar@gmail.com
जगात आपल्याएवढी मोठी उत्सवी अर्थव्यवस्था असणारा भारत हा एकमेव देश. विविध प्रांत, राज्य, साहित्य, कला-संस्कृती, आहारविहार, भाषा, निसर्ग एवढी विविधता असलेला हा आपला देश खरोखरच आगळावेगळा आहे. हे आपल्या देशाचे पर्यायाने आपल्या अर्थव्यवस्थेचे एक मूलभूत अंग आहे. विविध सण व उत्सव यांमुळे बाजारपेठेत एक उत्साहाचे वातावरण असते. नुकताच गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. तो संपताच नवरात्र, दसरा, दिवाळीमधील लक्ष्मीपूजन, भाऊबीज, पाडवा असे एकामागून एक सण येत असतात. सणांचा हा हंगाम कधी सुरु होईल, याची प्रत्येक जण जणू वाट पाहात असतो. अशा या आनंददायी व उत्साही वातावरणात बाजारपेठेत फार मोठी उलाढाल होते. सणासुदीच्या निमित्ताने अर्थव्यवस्थेला एकप्रकारे उभारी मिळते.