

Changing Investment Patterns of FIIs in Indian Capital Markets
Sakal
गौरव बोरा, शेअर बाजार विश्लेषक
भारतीय भांडवली बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (एफआयआय) एक महत्त्वाचा बदलता पॅटर्न दिसून येत आहे. गेल्या १२ महिन्यांत ‘एफआयआय’नी दुय्यम बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री केली असली, तरी त्याच काळात प्राथमिक बाजारातील आयपीओ, क्यूआयपी आणि इतर नव्या इश्यूमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे ‘एफआयआ’चा पैसा भारतातून बाहेर जात आहे का? हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.