
आजचा जमाना यूट्यूबर, इन्स्टाग्रामवर रिल्स करणारे यांचा आहे. विविध विषयांवर व्हिडीओ करणाऱ्यांचा तरुण पिढीवर मोठा प्रभाव पडत आहे. त्यामुळे या ‘एन्फ्ल्युएन्सर्स’ची लोकप्रियता वाढत आहे आणि त्यातून त्यांचीही भरपूर कमाई होत आहे. यात आर्थिक विषयांवर सल्ला देणाऱ्या ‘फिनफ्लुएन्सर्स’ची दिवसेंदिवस भर पडत आहे. आजकाल हे ‘फिनफ्लुएन्सर्स’ म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ आणि ‘एसडब्ल्यूपी’ यांवर सल्ले देत असल्याचे दिसत आहे. मात्र, या विषयांचे योग्य ज्ञान घेणे आवश्यक आहे.